July 3, 2024 7:22 PM

views 36

हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्याची घोषणा

उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या फुलराई गावात सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भेट घेतली. त्यानंतर मंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथक स्थापन केल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. या पथकाने प्राथमिक अहवाल सादर केला असून घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे अस...