September 29, 2024 3:50 PM

views 21

शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण

शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्या अनुषंगानं, ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा प्रारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईच्या कुर्ला इंथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.