February 11, 2025 3:35 PM

views 45

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागाकडून स्पष्ट

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आधी १३ जानेवारीपर्यंत मुदत होती; ती संपल्यानंतर केंद्र शासनाने २४ दिवसांची म्हणजे दिनांक ६ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याचं वृत्त काही माध्यमांमधून देण्यात आलं होतं; त्यावर ६ फेब्रुवारीनंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही असं पणन विभागानं स्पष्ट केलं आहे.

February 6, 2025 10:38 AM

views 48

परभणी – नाफेडमार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

परभणी जिल्ह्यात नाफेडमार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. आजपासून सरकारी खरेदी बंद होणार आहे मात्र नोंदणी केलेल्या 5 हजार 176 शेतकऱ्यांच्या सोयाबिनची खरेदी अजूनही झालेली नाही. मुदतीच्या काळात पोत्यांभावी 20 ते 25 दिवस सोयबीन खरेदी बंद होती. सर्व खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावीत, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केली आहे.