April 15, 2025 2:08 PM

views 49

डिजिटल अटक प्रकरणी चार जण सीबीआयच्या ताब्यात

डिजिटल अटक प्रकरणात सहभागी असलेल्या चार जणांना सीबीआय ने आज अटक केली आहे. राजस्थानमधल्या झुंझुनू इथे ४ महिने डिजिटल अटकेत राहिलेल्या पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सीबीआयने चौकशी सुरु केली होती. त्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात शोध मोहीम राबवून ही अटक केली आहे. काही सायबर गुन्हेगारांनी या पीडित व्यक्तीला फसवून ७ कोटींहून अधिक रक्कम हडप केली होती. या शोधमोहिमांमध्ये अनेक डेबिट कार्ड्स, चेकबुक आणि डिजिटल उपकरणे सापडली आहेत.

October 1, 2024 10:44 AM

views 42

सायबर गुन्हेगारीसंदर्भात सीबीआय चे देशभरात छापे, २६ जणांना अटक

जगभरातल्या लोकांची सायबर गुन्हेगारीद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीत सामील असलेल्या २६ जणांना काल केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय नं अटक केली. देशभरातल्या विविध ३२ ठिकाणी छापे घालून सीबीआय नं सायबर गुन्हेगारीचं हे जाळं उद्धस्त केलं. या प्रकरणी पुण्यातून १० जणांना अटक करण्यात आली असून पाच जणांना हैदराबादमधून तर ११ जणांना विशाखापट्टणम इथून ताब्यात घेतलं. या छाप्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मोबाइल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम यासह अन्य साहित्य सीबीआय नं जप्त केलं. या गुन्हेगारांनी परदेशातल्या, प्रामुख्यानं अ...

August 19, 2024 8:36 PM

views 52

लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या व्यवस्थापकासह चौघांना सीबीआयकडून अटक

लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं मध्य प्रदेशातल्या सिंगरौली इथल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड- NCL च्या व्यवस्थापकासह चौघाजणांना अटक केली. व्यवस्थापकाच्या घराची झडती घेतली असता, सुमारे चार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.  NCL साठी काम करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून ही रक्कम व्यवस्थापकानं लाच म्हणून घेतल्याची माहिती सीबीआयनं दिली.   सीबीआयनं अटक झालेल्या आरोपींपैकी एकजण मध्य प्रदेशात फार्म चालवतो, तसंच तो विविध कंत्राटदार,व्यापारी आणि NCL च्या अनेक अधिकाऱ्यांसाठी लाच घेण्यासाठी मध्...

July 12, 2024 9:16 AM

views 43

नीट प्रकरणी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं १८ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. दरम्यान, नीट-यूजी समुपदेशन प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होईल. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात दिली. तसंच नीट यूजी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केला. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रक...

July 11, 2024 12:17 PM

views 53

नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

निविदा आणि खरेदी प्रक्रियेतल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे निरीच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, बिहार आणि दिल्लीत 17 ठिकाणी काल छापेही घालण्यात आले. निरीतील पाच सरकारी अधिकारी, तसंच नवी मुंबई, ठाणे, प्रभादेवी इथल्या तीन खासगी संस्थांमधल्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयनं ही कारवाई केली. सर्वसाधारण आर्थिक नियम डावलून या संस...

July 1, 2024 8:15 PM

views 42

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनं लातूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या जलील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींना आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे, त्यामुळे त्यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.   

July 1, 2024 6:08 PM

views 50

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा आरोप

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.

June 29, 2024 7:31 PM

views 45

सीबीआयनं ३२ पारपत्र अधिकारी आणि मध्यस्थ आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे १२ गुन्हे नोंदवले

सीबीआयनं ३२ पारपत्र अधिकारी आणि मध्यस्थ आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचे १२ गुन्हे नोंदवले आहेत. ज्या अर्जदारांची माहिती अपुरी आहे किंवा पूर्ण दस्तऐवज नाहीत, त्यांना पारपत्र जारी करण्यासाठी भ्रष्टाचार आणि  गैरप्रकार करण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. यात  मुंबईतल्या लोअर परळ आणि मालाड इथल्या पारपत्र सेवा केंद्रांमधले १४ अधिकारी १८ दलालांचा समावेश आहे. याप्रकरणी २६ जूनला सीबीआय आणि दक्षता अधिकाऱ्यांनी मुंबई आणि नाशिक इथं ३३ ठिकाणी शोधमोहीम राबवली होती.

June 26, 2024 7:58 PM

views 42

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण: झारखंड मधल्या ओएसिस शाळेच्या मुख्याध्यापकाची सीबीआय चौकशी

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास  करणाऱ्या सीबीआय पथकानं आज झारखंड मधल्या हजारीबाग इथल्या ओएसीस शाळेत चौकशी सुरु केली. शाळेचे मुख्याध्यापक अहसनुल हक याना या पेपरफुटीबाबत पथकानं प्रश्न विचारले. फुटलेल्या प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीत प्रमाण कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं. नीट परीक्षेसाठी हे मुख्याध्यापक शहर समन्वयक  म्हणून काम पाहत होते.