April 5, 2025 9:50 AM

views 55

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर, द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल संध्याकाळी तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहोचले. श्रीलंकेच्या उच्चस्तरीय मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आज श्रीलंकेचे पंतप्रधान अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासाठी द्वीपक्षीय चर्चा करतील. भारताच्या शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या धोरणाचा श्रीलंका अविभाज्य भाग असून या भेटीत उर्जा, व्यापार, संपर्कजाळे, डिजीटलायझेशन आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये उभय देशांचे संबंध दृढ करण्याच्या हेतूने व्यापक चर्चा करतील. मोदी यांची श्रीलंकेला ही ...

October 4, 2024 12:38 PM

views 56

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा आज श्रीलंका दौरा

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आज श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ते श्रीलंकेच्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत. भारताच्या शेजारधर्म प्रथम या धोरणानुसार तसंच सागर दृष्टिकोनाला अनुसरून दोन्ही देशांचे पूर्वीपासूनचे संबंध अधिक बळकट करण्याच्या सामायिक बांधिलकीवर या दौऱ्यात प्रकर्षानं भर दिला जाईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

September 24, 2024 8:18 PM

views 58

श्रीलंकेच्या प्रधानमंत्रीपदी हरिणी अमरसुर्या यांचा शपथविधी

श्रीलंकेचे नवीन प्रधानमंत्री म्हणून हरिणी अमरसुर्या यांनी आज शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पॉवरच्या खासदार असलेल्या अमरसुर्या यांनी आज राष्ट्रपती सचिवालयात राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासमोर शपथ घेतली. दिसानायके यांनी कालच राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. एनपीपीचे खासदार विजित हेरथ आणि लक्ष्मण निपुण अराची यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

August 4, 2024 7:26 PM

views 48

दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य

कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं ९ गडी गमावून २४० धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं ३, तर कुलदीप यादवनं २ बळी घेतले.  शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं ५ षटकात बिनबाद २९ धावा केल्या होत्या.

July 24, 2024 2:58 PM

views 61

महिला आशिया टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीत दाखल

  महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं अ गटातल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ८२ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत १७८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकांत अवघ्या ९६ धावा करता आल्या. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं ४८ चेंडूत ८१ धावा केल्या. दयालन हेमलता हिनं शेफालीसह १२२ धावांची भागीदारी केली. गोलंदाजीत भारताकडून दीप्ती शर्मा हिनं तीन तर राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शेफाली वर्मा हिला ...

July 2, 2024 8:16 PM

views 45

जाफना जिल्ह्यात 934 रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पांना श्रीलंका सरकारची मंजुरी

भारत सरकारच्या मदतीनं श्रीलंकेच्या जाफना जिल्ह्यात ९३४ रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पांना श्रीलंकेच्या सरकारनं मंजुरी दिली आहे. श्रीलंकेच्या व्यवस्थापनानं ही माहिती दिली. जानेवारी २०१७ मध्ये दोन्ही देशांनी या संदर्भात सामंजस्य करार केला होता. या प्रकल्पांतर्गत जवळपास ३ हजार रेन वॉटर हार्वेस्टिंग टाक्या बांधल्या जाणार आहेत. यासाठी ३०० दशलक्ष श्रीलंकन ​​रूपये खर्च केले जाणार आहेत.

June 17, 2024 3:00 PM

views 73

टी- ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेकडून नेदरलँडचा ८३ धावांनी पराभव

टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंकेने नेदरलँडचा ८३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने केलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ ११८ धावांवर गारद झाला. २१ चेंडूत ४६ धावा करणारा श्रीलंकेचा चेरित असालंका सामनावीरचा मानकरी ठरला आहे.   या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नेपाळला २१ धावांनी मात दिली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने नेपाळसमोर उभारलेलं १०६ धावांचं आव्हान पूर्ण करताना नेपाळचा संघ ८५ धावांवर ढेपाळला. या सामन्यानंतर बांगलादेशने सुपर ८ मध्ये आपलं स्थान पक्क...