November 11, 2024 2:05 PM

views 44

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात करणार श्रीलंकेचा दौरा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात आर्थिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या आढाव्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख पीटर ब्रेअर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ श्रीलंकेची आर्थिक धोरणं, सुरू असलेल्या सुधारणांवरील प्रगती आणि मागील करारांच्या अंमलबजावणीचा आढावा घेईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी श्रीलंकेला कर्जाचा पुढील हप्ता वितरीत करेल. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं विस्तारित निधी सुविधेला मंजुरी दिली होती.

July 9, 2024 5:06 PM

views 73

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि मागण्यांचं निवेदन केलं सादर

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांविषयी निवेदन सादर केलं. विधानपरिषदेचं सभापती पद हे गेले अडीच वर्ष रिक्त आहे. विधान परिषदेच्या सभापती पदासारखं संवैधानिक पद रिक्त असणं लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीसाठी याच अधिवेशनात तारीख जाहीर करावी, अशी विनंती शिष्टमंडळानं केली.