April 17, 2025 9:46 AM
106
महाराष्ट्रात अमरावतीमध्ये अग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था होणार सुरू
अमरावती इथं सुरू केली जाणारी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था अग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ करताना ते बोलत होते. दरवर्षी 180 वैमानिक अमरावतीमध्ये तयार होतील आणि जवळपास ३४ विमानं या संस्थेत उपलब्ध असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या १० वर्षांत देशातल्या विमानतळांची संख्या, विमानं आणि हवाई वाहतूक मार्ग...