February 5, 2025 3:46 PM

views 60

महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा झाली आहे. इचलकरंजीतल्या शिवनाकवाडी गावात यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादातून सुमारे ३०० ते साडे तीनशे जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

August 18, 2024 11:21 AM

views 58

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केकत जळगाव इथल्या दोनशेहून जास्त मुलांना बिस्किटं खाल्ल्यानं विषबाधा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या केकत जळगाव इथं काल बिस्कीटं खाल्ल्यानं दोनशेहून जास्त मुला-मुलींना विषबाधा झाली. याठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात काल अर्धवेळ शाळा असल्यानं खिचडी ऐवजी दोन कंपन्यांच्या बिस्कीटांचं सकाळी वाटप झालं. ही बिस्कीटं खाल्ल्यावर अर्ध्या तासाने प्रारंभी ब-याच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि ताप असा त्रास झाला. या विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोड्याच वेळानंतर आणखी काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लाग...