April 9, 2025 10:38 AM

views 44

एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक धोरणांतर्गत महाराष्ट्र आणि विदर्भ ग्रामीण बँकेचं एकत्रीकरण

एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार ४३ प्रादेशिक बँकांच्या एकत्रिकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँकेत विलीन केली जाईल. १ मे पासून हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल. या एकत्रित बँकेचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल.