November 6, 2024 8:44 AM

views 157

वंचित बहुजन आघाडीचा ‘जोशाबा समतापत्र’ जाहीरनामा प्रकाशित

महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेला वंचित बहुजन आघाडीचा 'जोशाबा समतापत्र' या नावाचा निवडणूक जाहीरनामा काल पुण्यात, पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. महिलांना मासिक 3500 रुपये वेतन, शेतमालाला हमीभाव देणारा कायदा, जात जणगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी, बौद्ध अनुयायांना मोफत धम्म सहल अशा विविध मुद्द्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा राज्यातील जनता ...

October 28, 2024 6:51 PM

views 49

काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत राजगृह इथं हा पक्ष प्रवेश झाला. अनिस अहमद यांना वंचित बहुजन आघाडीने नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

October 20, 2024 3:31 PM

views 41

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांचा प्रचाराला सुरुवात

बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांनी आज चकलांबा गावातून प्रचाराला सुरुवात केली. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीनं गेवराईत आपला उमेदवार जाहीर केला आहे.   गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडित आणि पवार या दोन राजकीय कुटुंबात सत्ता राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीचं समीकरण बदललं आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित, तर महाविकास आघाडीकडून लक्ष्मण पवार ...

June 26, 2024 7:07 PM

views 52

वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण हक्क परिषदेत आरक्षणाची १०० टक्के अंमलबजावणी करण्याची मागणी

छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमातून पक्षानं दिलेले ११ ठराव मांडण्याचे आणि त्या ठरावाचे बॅनर शहरातल्या मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षानं दिले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी आरक्षणाची प्रामाणिक आणि प्रभावीपणे १०० टक्के अंमलबजावणी करावी, असा ठराव वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण हक्क परिषदेत करण्यात आला. "खाजगीकरणात आरक्षणाची" तरतूद करावी यासाठी लढा उभारण्याचा ठरावही या परिषदेनं केला. आ...