June 14, 2024 10:00 AM

views 29

१८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी येत्या २६ जूनला होणार निवडणूक

१८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी येत्या २६ जूनला निवडणूक होणार आहे. संसदेचं पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात येईल. याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतील. राज्यसभेचं सत्र २७ जूनपासून सुरु होणार आहे.