January 16, 2025 8:42 AM

views 64

७७ वा लष्कर दिन सर्वत्र साजरा-संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात मुख्य संचलन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ७७ वा लष्कर दिन काल साजरा झाला. १९४९ मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती. राज्यात लष्कर दिनाचं मुख्य संचलन पुण्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी झालेल्या गौरवगाथा या कार्यक्रमात बोलतांना, लष्कर दिन हा फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर वर्षाचे ३६५ दिवस डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या सैनिकांचा गौरव असल्याचं प्रतिपादन ...