November 9, 2024 10:46 AM

views 40

पुण्यात येत्या 12 तारखेपासून राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धांचं आयोजन

तीक्ष्ण नजर आणि एकाग्रता ही नेमबाजी या खेळाची बलस्थानं... पण नजरच नसेल तर ? पण तरीही हा खेळ खेळता येऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकही मिळवता येऊ शकतं हे दिव्यांग नेमबाजांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अशीच चमकदार कामगिरी करणाऱ्या दिव्यांगाच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पुण्यात रंगणार आहेत. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा होत आहेत. टोकियो आणि पॅरिस पॅरालिंपिक सुवर्ण पदक विजेत्या खेलरत्न पुरस्कार विजेत्...