November 6, 2024 10:09 AM

views 59

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं लातूर ग्रामीण विधानसभेतले मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.  

October 18, 2024 8:05 PM

views 64

टोलमुक्तीसाठी मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या तक्रारी मागे घेण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी

मुंबईत टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेल्या आंदोलना दरम्यान मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या तक्रारी मागे घेतल्या पाहिजेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आज ते ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते. गेली अनेक वर्ष जी टोलवसुली सुरु होती त्यातून नक्की किती पैसे गोळा झाले याचा कोणताही हिशोब नाही नसल्याचं ते म्हणाले. इतक्या वर्षांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.

October 12, 2024 7:05 PM

views 59

मतदानाचं शस्त्र योग्य पद्धतीनं वापरून क्रांती करण्याचं राज ठाकरे यांचं मतदारांना आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त मतदारांशी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदारांनी बेसावध राहू नये, मतदानाचं शस्त्र योग्य पद्धतीनं वापरून क्रांती करावी, असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र साकारण्याची संधी जनतेनं द्यावी, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपण घडवू, असं आश्वासन त्यांनी दिलं. आजपर्यंत जनतेनं ज्यांना निवडून दिलं, त्यांनी जनतेच्या मतांशी प्रतारणा केली, त्यांना गृहीत धरलं, असा आरोपही त्यांनी के...