September 6, 2025 1:42 PM

views 87

भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती

भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्रहित सर्वोपरी असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो, योग्य दर आणि लॉजिस्टिक्सनुसार आपल्या आवश्यकतांना प्राधान्य दिलं जाईल, असं त्या काल एका मुलाखतीत  म्हणाल्या. भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचं प्रमाण अधिक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.  नवीन जीएसटी प्रणालीमुळे वस्तूंचा खप वाढेल मात्र त्यामुळे भांडवली खर्चावर काहीही परिणाम होणार नाही...

June 13, 2025 10:32 AM

views 61

रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्दबंदींची सुटका करण्याचा दुसरा टप्पा पुर्ण

रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्दबंदींची सुटका करण्याचा दुसरा टप्पा काल पुर्ण झाला. यामध्ये आजारी असलेले बंदी, युध्दामुळे गंभीर जखमी झालेल्या सैन्यदलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या, राष्ट्रीय गार्डच्या आणि सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना मुक्त करण्यात आलं असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी दिली. तर रशियाच्या एका समूहाचे सैनिक युक्रेनच्या कैदेतून परत आले आहेत आणि ते बेलारूसमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली असल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे...

December 7, 2024 2:32 PM

views 52

संरक्षण मंत्री राजनाथसिंह उद्यापासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथसिंह उद्यापासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्याबरोबर २१व्या भारत रशिया सरकारस्तरावरील चर्चेत सहभागी होणार असून यावेळी त्यांच्यात संरक्षण आणि संरक्षण उद्योग यातल्या सहकार्यावर चर्चा होणार आहे. राजनाथ सिंह सोमवारी लेनिनग्राड इथं भारतीय नौसेनेच्या क्षेपणास्त्रधारी आयएनएस तुशील या युद्धनौकेचं कमिशन करतील. यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठीही उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात संरक्षण मंत्री रशियातल्या भा...

September 30, 2024 6:51 PM

views 96

रशियाचा यूक्रेनची राजधानी कीववर ड्रोन हल्ला

रशियाने आज पहाटे यूक्रेनची राजधानी कीव इथे ड्रोन हल्ला केला. रशियाने डागलेल्या ७३ पैकी ६७ ड्रोन आणि तीन क्षेपणास्त्रांपैकी एक पाडलं. या दरम्यान, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती यूक्रेन सैन्याने दिली आहे.

July 9, 2024 7:52 PM

views 77

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज रशियातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द अपॉस्टल या नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा सन्मान प्रधानमंत्री मोदी यांना दिला. रशिया आणि भारत देशांतील विशेषाधिकार धोरणात्मक भागिदारी विकसीत करण्यासाठी आणि उभय देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला. रशियाचे पहिले प्रेषित सेंट अँड्र्यूज यांच्या सन्मानार्थ झा...

July 9, 2024 7:01 PM

views 64

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

आगामी काळात भारत- रशिया संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. भारत - रशिया शिखर परिषदेप्रसंगी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. गेली ४०-५० वर्ष भारत दहशतवादाचा सामना करत आहे, त्यामुळे मॉस्कोमधल्या दहशतवादी  हल्ल्यावेळी झालेली वेदना आपण समजू शकतो, असं त्यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद निंदनीय असल्याचं ते म्हणाले. रशियासोबतच्या सहकार्यामुळे  भारतीय शेतकरी आणि भारतीय ग्राहकांचा मोठा ...

June 22, 2024 5:59 PM

views 95

रशियाचा युक्रेनमधे पॉवर ग्रीडवर जोरदार हल्ला

युक्रेनमधे लीव शहरातल्या वीज निर्मिती आणि पारेषणाच्या पॉवर ग्रीडवर रशियाने केलेल्या जबरदस्त हल्ल्यात दोन वीज कामगार जखमी झाले. युक्रेनच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं, की रशियाने  डागलेल्या१६ क्षेपणास्त्रांपैकी १२ आणि १३ ड्रोन युक्रेनच्या हवाई दलानं निकामी केली. युक्रेनमधल्या पायाभूत सुविधांवर रशियाने गेल्या ३ महिन्यात केलेला हा आठवा हल्ला होता. 

June 18, 2024 3:14 PM

views 75

व्लादिमीर पुतिन या आठवड्यात उत्तर कोरियाला भेट देणार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या आठवड्यात उत्तर कोरियाला भेट देणार आहेत. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातली द्विपक्षीय भागीदारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता असताना पुतिन यांच्या भेटीचं नियोजन करण्यात आल्याची माहिती उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे. उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील सखोल लष्करी भागीदारी ही चिंतेची बाब असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं काल सांगितलं. व्लादिमीर पुतिन यांचा २४ वर्षांतला हा पहिलाच उत्तर कोरिया दौरा आहे.

June 17, 2024 3:07 PM

views 115

रशियाच्या विशेष कृती दलानं दहशतवाद्यांच्या ताब्यातून २ कारागृह कर्मचाऱ्यांची केली सुटका

रशियाच्या विशेष कृती दलानं दहशतवाद्यांच्या ताब्यातून २ कारागृह कर्मचाऱ्यांची सुटका केली. यावेळी रोस्टोव्ह शहरात काल झालेल्या चकमकीत इस्लामिक दहशतवादी गटाच्या सहा जणांना गोळ्या घालण्यात आल्या. हे सहा जण या कारागृहात बंदी होते. त्यांनी दोन जेल कर्मचाऱ्यांना बंदी करत त्या बदल्यात आपल्या सुटकेची मागणी केली होती. मार्च महिन्यात मॉस्कोच्या एका सभागृहावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी तसचं दहशतवादी कारवायांप्रकरणी  अटक केली होती.