August 27, 2024 8:05 PM

views 64

रशिया-युक्रेन संघर्षावर प्रधानमंत्र्यांचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी रशिया-युक्रेन संघर्षावर आज दूरध्वनीद्वारे संवाद साधला. धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याविषयी चर्चा केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं. नुकत्याच झालेल्या युक्रेन भेटीतल्या अनुभवाविषयीही पुतीन यांच्याशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. संघर्षावर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मोदी यांनी केला.

June 17, 2024 11:04 AM

views 69

रशिया युक्रेन संघर्षावर चर्चा आणि राजकीय धोरणांद्वारे कायमस्वरुपी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारताचा भर

रशिया युक्रेन संघर्षावर चर्चा आणि राजकीय धोरणांद्वारे कायमस्वरुपी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारतानं भर दिला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या युक्रेन शांतता परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे सचिव पवन कपूर सहभागी झाले होते. या परिषदेत त्यांनी भारताचा दृष्टीकोन स्पष्ट केला. या परिषदेतल्या विचारविनिमयानंतर प्रकाशित करण्यात आलेल्या कोणत्याही परिपत्रकाबाबत सहमती दर्शवण्यास भारतानं नकार दिला आहे. भारताचा या परिषदेतला सहभाग या संघर्षावर चर्चेतून कायमस्वरुपी, शांतताप...