October 10, 2024 2:23 PM

views 62

महान उद्योगपती रतन टाटा यांचं दीर्घ आजारानं निधन, आज संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव सध्या मुंबईच्या एनसीपीए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. सायंकाळी वरळीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं टाटा यांच्या सन्म...