June 13, 2025 2:14 PM

views 44

देशाच्या उत्तर भागात उष्णतेची लाट तर महाराष्ट्रासह दक्षिणेत मुसळधार पावसाचा इशारा

कर्नाटकात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीलगतचा भाग, उत्तरेकडील बेळगावी, धारवाड, गडग, हावेरी, दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलूर, कोडगू, शिवमोगा आणि दावणगिरी इथं जोरादार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.   महाराष्ट्रातही पुणे कोल्हापूर सांगलीसह विविध जिल्ह्यात काल जोरदार पाऊस पडला. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, गोवा आणि महाराष्ट्रात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी ताशी 60 ते70 किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहतील...

July 28, 2024 6:13 PM

views 27

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला.    येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.