June 20, 2024 12:26 PM

views 39

सायबरसज्जता वाढवण्यासाठी सीईआरटी आणि मास्टरकार्ड इंडिया यांच्यात सहकार्य करार

देशात आर्थिक क्षेत्रात सायबरसज्जता वाढवण्यासाठी भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक म्हणजे सीईआरटी आणि मास्टरकार्ड इंडिया यांच्यात सहकार्य करार करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयानं याबाबत माहिती दिली. या दोन्ही संस्था सायबरसुरक्षिततेबाबत प्रतिसाद देण्यासाठीची यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकत्र काम करतील. त्यासाठी देशभरात प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.