April 9, 2025 1:54 PM

views 61

म्यानमारच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३ हजार ६४५ वर

म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता ३ हजार ६४५ वर पोचली आहे. एकंदर ५ हजार १७ लोक जखमी झाले असून, १४८ नागरीक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं काल संध्याकाळी दिली आहे. २८ मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत ९८ भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमाच्या हवामानशास्त्र आणि जलविज्ञान विभागानं म्हटलं आहे. यामध्ये सागाइंग, मंडाले आणि मॅगवे या प्रमुख शहरांमधल्या ८० टक्क्यांहून अधिक इमारतींचं नुकसान झालं आहे. दरम्यान, भारताच्या ऑपरेशन ब्रह्मासह युरोपीय राष्ट्र, अमे...

April 1, 2025 10:15 AM

views 63

म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर

म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात, झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर गेली आहे. म्यानमारच्या मंडाले भागाला शुक्रवारी अगोदर ७ पूर्णांक ७ रिख्टर आणि त्यापाठोपाठ काही मिनिटांनी ६ पूर्णांक ४ एवढ्या मोठ्या क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसल्यानं म्यानमारसह आसपासच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. देशात भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या आता २ हजार ५६ झाली असून ३ हजार ९०० च्या वर नागरिक जखमी झाले आहेत. तर जवळपास २७० व्यक्ती अद्याप बेपत्ता आहेत, असं म्यानमारच्या लष्...

January 7, 2025 10:50 AM

views 50

दिल्ली, नोएडासह देशाच्या उत्तर भागात आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

देशात बिहार, दिल्ली नोएडा, आणि सिक्कीमच्या काही भागात तसंच नेपाळमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा भूकंप जाणवला. नेपाळमधील लोबुचे पासून 93 किलोमीटर अंतरावर ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळमध्ये या भूकंपाची 7 पूर्णांक 1 रिखटर एवढी तीव्रता नोंदवली गेली. याबाबत अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

December 5, 2024 10:05 AM

views 65

चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्याला जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्यात काल सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 पूर्णांक 3 रिख्टर होती आणि तेलंगण राज्यातील मुलुगु इथं या भुकंपाचा केंद्रबिंदू होता, असं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं जाहीर केलं आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळं कोणतीही जिवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

July 9, 2024 11:15 AM

views 50

जपानमध्ये पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप

जपानमध्ये आज सकाळी पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार हाभूकंप काल मध्यरात्री 1 वाजून 32 मिनिटांनी झाला. भूकंपाचं केंद्र पश्चिमओगासावारा बेटांवर 530 किलोमीटर खोलीवर, 27 पूर्णांक1 दशांश अंश उत्तर अक्षांश आणि 139 अंशपूर्व रेखांशावर होतं. या भूकंपामुळेत्सुनामीचा धोका नसून कोणीही जखमी झाल्याचं किंवा कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्तनाही असं जपानच्या स्थानिक हवामान संस्थेनं म्हटलं आहे.