October 15, 2024 11:51 AM

views 55

आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल – प्रकाश आंबेडकर

आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर त्यांनी यावेळी टीका केली. अदिवासी आणि ओ बी सी समाजाची एकत्रित मोट आम्ही बांधत असून, एक दोन दिवसात हे कार्य शंभर टक्के पूर्ण होईल नंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं, आंबेडकर यांनी नमूद केलं.

October 2, 2024 7:33 PM

views 50

ओबीसी समाजाने साथ दिली तर वंचित बहुजन आघाडीला तीन आकडी जागा मिळतील -प्रकाश आंबेडकर

आगामी निवडणुकीत ओबीसी समाजाने साथ दिली तर वंचित बहुजन आघाडीला तीन आकडी जागा मिळतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते मनमाड इथं आदिवासी सत्ता संपादन परिषदेच्या वेळी बातमीदारांशी बोलत होते. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देऊ नये, या मागणीला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. आदिवासी आणि ओबीसीं समूहांना एकत्र करून तिसरी आघाडी स्थापन करणार असून नागपूरला या तिसऱ्या आघाडीच्या नावाची अधिकृत घोषणा करू असं ते म्हणाले.