November 14, 2024 1:17 PM

views 35

१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. यामध्ये राजस्थानातले सात, पश्चिम बंगालमधले सहा, आसाममधले पाच, बिहारमधले चार, कर्नाटकातले तीन आणि मध्य प्रदेशातल्या दोन जागांचा समावेश आहे. याशिवाय केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालयमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी काल मतदान  झालं. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुमारे ६५ टक्के मतदान झालं.

July 13, 2024 3:05 PM

views 58

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. १० जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघाचा निकाल घोषित झाला असून इथं आम आदमी पार्टीचे मोहिंदर भगत हे विजयी झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशमधल्या देहरा मतदारसंघात काँग्रेसचे कमलेश ठाकुर जिंकले आहेत. इतर मतदारसंघांचे कल स्पष्ट झाले असून पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि मणिकताल या चारही मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तराखंडमधल्या ...