July 13, 2024 8:59 PM

views 62

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत.  पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या देहरा आणि नलगढ मतदारसंघात काँग्रेसच्या, तर हमीरपूरमध्ये भाजपा उमेदवाराने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, बागडा, रणघाट दक्षिण, आणि मणिकताल या चारही मतदारसंघांमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशातल्या अमरवाडामध्ये भाजपा, तर उत्तरखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलौरमध्ये काँग्रेसचे...