June 18, 2025 3:30 PM

views 72

खरीपाच्या पेरण्यांमध्ये देशभरात यंदा १ पूर्णांक ४८ शतांश टक्के वाढ

खरीपाच्या पेरण्यांमध्ये देशभरात यंदा १ पूर्णांक ४८ शतांश टक्के वाढ झाली आहे. शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने १३ जून २०२५पर्यंत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात झालेल्या प्रगतीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाताच्या पेरणीत ५३ शतांश टक्के वाढ झाली आहे. कडधान्य पेरणीत ४७ शतांश, तेलबिया ५५ शतांश आणि ऊसाच्या पेरणीत २० शतांश टक्केची वाढ झाली आहे. तर तूर पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ११ शतांश टक्क्यांची घट झाली आहे. त्याशिवाय भरड धान्य २ शतांश ...

June 18, 2025 9:05 AM

views 70

राज्यात आतापर्यंत सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

राज्यातल्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११ पूर्णांक ७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ सरासरी आठ टक्के इतकं आहे. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.