August 10, 2024 4:05 PM

views 46

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतची कांस्यपदकाला गवसणी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत यानं काल पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यानं प्युर्टो रिकोच्या डेरियन क्रूजला १३-५ असं हरवलं. पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे भारताचं सहावं आणि कुस्तीतलं पहिलं पदक आहे. २१ वर्षं आणि २४ दिवस वय असलेला अमन ऑलिम्पिक पदक पटकावणारा सर्वात कमी वयाचा भारतीय ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या यशाबद्दल अमन सेहरावत याचं अभिनंदन केलं आहे...

July 25, 2024 8:29 PM

views 58

पॅरिस ऑलिम्पिकमधे नेमबाजीच्या रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून भारतीय महिला संघाचं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित

पॅरिस ऑलिम्पिकच्या उदघाटन समारंभाच्या एक दिवस आधी, आज भारतानं शानदार कामगिरीनं सुरुवात केली. नेमबाजीमध्ये भारतीय महिला संघानं रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. भारतीय तिरंदाज तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्यासह दीपिका कुमारी, अंकिता भकट, भजन कौर, आणि बी. धीरज, वैयक्तिक रँकिंग फेरीत भाग घेतला.   उपांत्यपूर्व फेरीत, भारताचा सामना यजमान फ्रान्स आणि नेदरलँड यांच्यात अंतिम-१६ टप्प्यात झालेल्या सामन्यातल्या विजेत्याबरोबर होईल. पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्ध...

July 9, 2024 8:10 PM

views 48

पुण्यातील पवन सिंह यांची ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेसाठी सलग दुसऱ्यांदा ज्युरी म्हणून निवड

पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्युरी अर्थात पंच म्हणून पुण्यातल्या गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंह यांची निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड होणारे सिंह हे पहिलेच भारतीय आहेत. ते नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव आहेत.  पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचे पथकप्रमुख म्हणून निवड झालेले आंतरराष्ट्रीय नेमबाज पद्मश्री गगन नारंग हेदेखील ‘गन फॉर ग्लोरी’ या नेमबाजी संस्थेचे सह-संस्थापक आहेत. या संस्थेच्या इलावे...