April 15, 2025 3:33 PM

views 48

निलंबित आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलं संरक्षण

निलंबित आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्या निर्णयाविरोधात खेडकर हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  

January 15, 2025 3:38 PM

views 32

पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं दिलं अटकेपासून संरक्षण

निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावर तिनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी घेतली, आणि तिच्याविरुद्ध कठोर पावलं उचलू नयेत, असे आदेश दिले.