July 29, 2024 9:53 AM

views 42

पुण्यात आणखी आठ जणांना झिकाची बाधा

पुण्यात आणखी आठ जणांना झिकाची बाधा झाली आहे; त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. पुण्यातल्या झिका रूग्णांची संख्या आता 45 झाली आहे. झिकाबाधित रुग्णांच्या इतर गुंतागुंतीच्या तपासण्याही आरोग्य विभाग करत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिलं आहे. एकीकडे झिका रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाणही  वाढत आहे. या महिन्यात डेंग्यूचे 11; तर चिकनगुनियाचे 8 रुग्ण आढळून आले असल्याचं महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ...

July 23, 2024 8:43 AM

views 60

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे आणि १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी जाहीर करण्यात...

July 4, 2024 9:27 AM

views 44

पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही-जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, गावांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासन पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याकरता नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी काम करत आहे असं सांगून कुठल्याही परिस्थितीत पुणे शहराला पाणी कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. पुण्यात गळती होणाऱ्या 40 टक्के पाण्याची बचत समान पाणी वाटप योजनेच्या माध्यमातून केल्यावर 4 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सदस्य रविंद्र धंगेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीस ...

July 4, 2024 8:55 AM

views 34

पुण्यात आढळला झिका विषाणूचा सातवा रुग्ण

पुणे शहरातील डहाणूकर कॉलनीमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळला आहे. ४५ वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिला असून तिला सौम्य लक्षणे आहेत.यापूर्वी निदान झालेल्या पाच महिलांपैकी दोन गर्भवती असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.राज्यात झिका विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत.या विषाणूचा गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास गर्भाच्या वाढी...

June 20, 2024 10:12 AM

views 37

पुणे शहरातील बहुचर्चित द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी जागा आरक्षित करण्यास मंजुरी

पुणे शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी बहुचर्चीत एच सी एम टी आर अर्थात उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी जागा आरक्षित करण्यास मंजुरी देउन त्याबाबतची अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागानं काढली आहे.संपूर्ण उन्नत असणारा सुमारे ३६ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी २४ मीटर असेल आणि वाहनांची वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात आली आहे. पुणे शहराच्या १९८७ च्या विकास आराखडयात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर २० वर्षानी म्हणजे २०१७ मध्ये मंजूर आराखड्...