July 3, 2024 8:25 PM

views 46

देशाची राज्यघटना प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे.   तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिलं. भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच राजकीय वारसा नसलेल्या व...

July 2, 2024 7:59 PM

views 51

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज आज संस्थगित झालं. २४ जूनला सुरु झालेलं हे कामकाज उद्या संपणार होतं. मात्र आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.

June 14, 2024 7:53 PM

views 57

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै दरम्यान

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात २८ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाचं कामकाज १३ दिवस चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतले विरोधी पक्षनेते वि...