April 17, 2025 1:45 PM

views 44

नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या ९ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक

नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या ९ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक करण्यात आली. हे सर्वजण महाराष्ट्रातले आहेत. त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं सोनं चांदी सापडली आहे. नेपाळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ७ किलो सोनं आणि ८ किलो चांदी जप्त करण्यात आली. या सोन्या चांदीची किंमत १ कोटी रुपये असून त्यांच्याकडून भारतीय आणि नेपाळी चलनही जप्त करण्यात आलं आहे.

September 30, 2024 7:18 PM

views 42

नेपाळमध्ये पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने आलेल्या पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते रिषीराम तिवारी यांनी ही माहिती दिली.  विविध नैसर्गीक संकटात २६० जण जखमी झाले आहेत.  पूर आणि भूस्खलन अशा  संकटात सापडलेल्या ४ हजार ५०० नागरिकांना मदत आणि बचाव कार्यातल्या सुरक्षादलांनी  सुरक्षित स्थळी हलवलं आहे. महामार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

August 24, 2024 6:41 PM

views 74

नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

नेपाळमध्ये झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या २५ जणांचा समावेश असून त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने  भारतात आणण्यात येणार आहेत. हे विमान संध्याकाळी सात वाजेपर्यंत जळगाव इथल्या विमानतळावर  पोहोचेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली. नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या काल झालेल्या अपघातात २७ जणांचा म...

August 19, 2024 8:40 PM

views 41

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची भेट

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची आज नवी दिल्लीत भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, व्यापार, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा विकास या मुद्द्यांवर चर्चा केली.    नेपाळ भारताला सुमारे एक हजार मेगवॉट वीज निर्यात करणार असल्याबद्दल डॉ. एस. जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये आनंद व्यक्त केला आहे. दोन्ही देशांतले सांस्कृतिक बंध आणि  भारताची शेजारधर्माच्या नीतीमुळे हे संबंध अधिक दृढ होत असल्याचंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. नेपाळच्या परराष...

July 22, 2024 8:15 PM

views 37

नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रातीला प्रारंभ

नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रातीला प्रारंभ झाला. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यानं काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिरात लाखो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नदीत स्नान केलं. त्यानंतर नदीतील पवित्र पाणी कलशातून मंदिरात आणून शिवलिंगावर अभिषेक केला. मान्सूनच्या आगमानाचं प्रतिक म्हणून महिलांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

July 21, 2024 8:18 PM

views 60

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये दोन तृतियांश मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सदनात हजर असलेल्या २६३ सदस्यांपैकी १८८ सदस्यांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. ७४ मतं विरोधात गेली, तर एका सदस्यानं तटस्थ भूमिका घेतली. ओली यांची १४ जुलै रोजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदावर नियुक्ती झाली होती

July 13, 2024 3:20 PM

views 40

पुष्पकमल दहल प्रचंड यांनी बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्ष नेते के. पी. शर्मा ओली यांचा सरकार स्थापनेचा दावा

नेपाळमधे पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्ष नेते के. पी. शर्मा ओली यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची काल रात्री उशिरा भेट घेऊन ओली यांनी नेपाळ काँग्रेस आणि इतर लहान पक्षांचा पाठिंबा अपल्याला असल्याचा दावा सादर केला. येत्या ३ दिवसात त्यांना सरकार स्थापन करायचं आहे. २७५ सदस्यांच्या नेपाळ संसदेत नेपाळ काँग्रेसचे ८९, एमालेचे ७८ आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे १४ सदस्य आहेत.