July 16, 2024 9:25 AM

views 68

छत्रपती संभाजीनगर येथे म्हाडाची आज संगणकीय सोडत

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत आज संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. १ हजार ४९४ गाळे,सदनिका, निवासी भूखंडाचा यात समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येणार आहे.