June 13, 2025 11:09 AM

views 31

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महापालिकेसह अ, ब आणि क वर्ग दर्जाच्या महापालिकांना प्रभाग रचना प्रक्रिया ११ जून ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान पूर्ण करायची आहे. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना २९ ऑगस्ट ते चार सप्टेंबर २०२५ दरम्यान अधिसूचनेद्वारे जाहीर केली जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.  

February 6, 2025 1:37 PM

views 41

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकंदर ६० पूर्णांक ४२ टक्के मतदानाची नोंद

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी काल शांततेत मतदान झालं. एकूण ६० पूर्णांक ४२ शतांश टक्के मतदान झालं असून सर्वाधिक ६४ टक्के मतदान ईशान्य दिल्लीत झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. तर अग्नेय दिल्ली मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं. आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, मनिष सिसोदिया, प्रवेश वर्मा, विजेंदर गुप्ता, अलका लांबा यांसारख्या दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. निवडणूक सुरळित पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्रांवर...

February 5, 2025 2:18 PM

views 38

दिल्ली विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून चोख बंदोबस्त

दिल्ली विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्याविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. राजधानीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी, त्यांना अटक करण्यासाठी आणि त्यांना हद्दपार करण्यासाठी अनेक भागात छापे टाकले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी ३० हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी आण...

February 5, 2025 4:13 PM

views 70

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान होत असून दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३३ पूर्णांक ३१ शतांश टक्के मतदान झालं आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निवडणूक आयोगानं १ लाख ८० हजारापेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले आहेत. या निवडणुकीत अनेक प्रमुख नेत्यांचं राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. यात आम आदमी...

November 9, 2024 10:06 AM

views 61

निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांचं प्रतिपादन

निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. जिल्हाधिकारी स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, आज सकाळी साडे अकरा वाजता आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर, या यू- ट्यूब चॅनेलवर देखील आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.

September 28, 2024 3:52 PM

views 48

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत सर्व १० जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे उमेदवार सर्व १० जागांवर विजयी झाले. खुल्या प्रवर्गातल्या ५ जागांवर  प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले.  राखीव प्रवर्गातून शीतल शेठ देवरुखकर, धनराज कोहचाडे, शशिकांत झोरे, मयुर पांचाळ आणि स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले.

July 2, 2024 6:57 PM

views 51

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १४ उमेदवारांचे एकूण २४ अर्ज दाखल

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत ११ जागांसाठी १४ उमेदवारांनी एकूण २४ अर्ज भरले आहेत. भाजपाच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनीही अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्...

July 1, 2024 8:05 PM

views 48

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या नावावर भाजपाच्या केंद्रिय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याचं काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.

June 18, 2024 7:07 PM

views 58

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. विधानसभेच्या आमदारांकडून या सदस्यांची निवड होणार आहे.  या निवडणुकीची अधिसूचना २५ जून रोजी जारी होणार असून २ जुलैपर्यंत अर्ज भरता येतील. ३ जुलैला अर्जांची छाननी होईल आणि ५ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १२ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ दरम्यान मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.  मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा...