August 16, 2025 11:43 AM

views 58

जीएसटी दरांमधील सुधारणांच्या संकेताचे व्यापार जगताकडून स्वागत

स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये सुधारणा करून, उद्योगजगत आणि सामान्य नागरिकांवरचा बोजा कमी करण्याचे संकेत दिले. जीएसटी सुधारणा ही काळाची गरज असल्याचे सांगून जीएसटी दरांचा आढावा घेण्याची गरज मोदींनी अधोरेखित केली होती.  प्रधानमंत्र्यांच्या या घोषणेचे उद्योग जगताकडून स्वागत झाले आहे. कर प्रणालीचे सुलभीकरण आणि व्यापाराला चालना देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक पाऊल असल्याची प्रतिक्रिया उद्योग जगताकडून आली आहे. सध्या व्यापाऱ्यांना ५ ते २८ टक्के करदराला तोंड द्या...

August 15, 2025 8:30 PM

views 78

जीएसटी मधे येत्या दिवाळीत सुधारणा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

भारताला २०४७ पर्यंत विकसित करण्यासाठी आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करुन काम करा, नवीन संधी निर्माण करा, आणि देशातल्या १४० कोटी नागरिकांना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. देशवासियांना संबोधित करताना सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या महापुरुषांना अभिवादन केलं तसं...

August 24, 2024 3:50 PM

views 56

युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव

शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. युक्रेन दौरा यशस्वीपणे पूर्ण करुन प्रधानमंत्री आज मायदेशी परतले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी विधायक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहीलं असून युक्रेनमधल्या पाहुणचाराबद्दल आभार व्यक्त केले आहेत. रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भा...

August 24, 2024 7:20 PM

views 65

मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार

  आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११३ वा भाग आहे.  हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होईल. newsonair.gov.in हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे यूट्यूब चॅनल, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आ...

August 10, 2024 8:34 PM

views 67

संपूर्ण देश आणि केंद्र सरकार वायनाड इथल्या भूस्खलनानं बाधित लोकांच्या पाठीशी उभा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

    केरळमधल्या वायनाड इथं झालेल्या भूस्खलनामुळे बाधित लोकांच्या पाठीशी संपूर्ण देश आणि केंद्र सरकार उभं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज वायनाड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मदत आणि पुनर्वसन कामाबाबत आढावा बैठकीला संबोधित केलं. मदतकार्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं  आश्वासन त्यांनी दिलं. यादृष्टीनं राज्याच्या गरजांबाबत तपशीलवार निवेदन पाठवावं असं आवाहन त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना केलं. राज्य सरकारनं भूस्खलनामुळे बाधित झाल...

July 25, 2024 2:59 PM

views 75

पंचविसाव्या कारगील विजय दिना निमित्त, प्रधानमंत्री उद्या कारगील युद्ध स्मारकाला भेट देणार

पंचविसाव्या कारगील विजय दिना निमित्त, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कारगील युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. आपलं कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना ते श्रद्धांजली अर्पण करतील. यावेळी ते दूरस्थ पद्धतीनं शिंकुन-ला बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंग स्फोटही करतील. निमू-पदुम-दारचा मार्गावर सुमारे पंधरा हजार ८०० फूट उंचीवर हा दुपदरी बोगदा बांधला जाणार असून, लेह या भागाशी कोणत्याही ऋतूत संपर्क साधण्यासाठी तो उपयोगी ठरेल. शिंकुन-ला, हा जगातला सर्वात जास्त उंचीवरचा बोगदा असेल. आपल्या सशस्त्र...

July 23, 2024 8:48 AM

views 80

यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल – प्रधानमंत्र्यांचा विश्वास

संसदेत सादर होणारा यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल; 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा पाया या अर्थसंकल्पातून घातला जाईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. हे अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी आपापल्या पक्षासाठी काम केलं; जनतेने आपला निकालही दिला; आता पुढची पाच वर्ष सर्व राजकीय पक्...

July 13, 2024 9:18 PM

views 67

महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्तीकेंद्र बनवण्याचं लक्ष्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र आणि फिन्टेक राजधानी बनवणं हे आपलं हे आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्र हे समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या ...

July 11, 2024 12:53 PM

views 79

पीएलआयमुळे देशातील उत्पादन, रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि निर्यातीमध्ये वाढ

भारताला प्रत्येक क्षेत्रात 'आत्मनिर्भर' करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठीच्या तसेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी पीएलआय अर्थात उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातील उत्पादन, रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि निर्यातीमध्ये वाढ झाली असल्याचं दूरसंचार आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. दूरसंचार विभागासाठी पीएलआय लागू केल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत, या योजनेत 3 हजार 4 शे ...

July 11, 2024 2:55 PM

views 97

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देशातल्या नामांकित अर्थतज्ज्ञांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत देशातल्या नामांकित अर्थतज्ज्ञांशी संवाद साधत आहेत. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत ते या अर्थज्ज्ञांची मतं आणि सूचना जाणून घेत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्यही या बैठकीत उपस्थित आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.