April 5, 2025 1:36 PM

views 43

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक २०२५ वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी

स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक २०२५ वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वक्षरी केली आहे. परदेशी नागरिकांचा भारत प्रवेश, वास्तव्य आणि स्थलांतर याविषयीचे नियम या विधेयकात आहेत. यापूर्वीचे पारपत्र कायदा १९२०, परदेशी नागरिक नोंदणी कायदा १९३९, तसंच परदेशी नागरिक कायदा १९४६ आणि भारतात स्थलांतर कायदा २००० हे ब्रिटीशकालीन कायदे या नव्या कायद्याने मोडीत काढले आहेत. गेल्या आठवड्यात संसदेने हे विधेयक मंजूर केलं. नवीन कायद्यानुसार बनावट पारपत्र वापरणं किंवा पुरवणं या गुन्ह्यांकरता ७ वर्षं पर्यंत कैद आणि...

July 10, 2024 7:44 PM

views 35

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फूटबॉल स्पर्धेच्या विजयचिन्हांचं अनावरण

राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या फूटबॉल स्पर्धेच्या विजयचिन्हांचं अनावरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात ड्युरँड चषक, राष्ट्रपती चषक आणि सिमला चषक स्पर्धांच्या विजयचिन्हांचा समावेश आहे. ड्युरँड चषक सामन्यांमधे भाग घेणाऱ्या खेळाडूंना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

June 22, 2024 7:57 PM

views 40

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या सोमवारपासून

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या सोमवारपासून, म्हणजेच २४ जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात हंगामी सभापती भर्तृहरी मेहताब नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. लोकसभेच्या नव्या सभापतीपदाची निवडणूक २६ जून रोजी होईल, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जूनला संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील. राज्यसभेचं अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ३ जुलै रोजी संपेल.