June 27, 2024 3:21 PM

views 36

दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर जाहीर करण्याची दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर जाहीर करा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. दुधाला उसाप्रमाणे एफआरपी, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना, पशुखाद्य आणि पशु औषधांचं दर नियंत्रण इत्यादी मागण्या संघर्ष  समितीने केल्या आहेत.