June 21, 2024 6:21 PM

views 71

महायुती सरकारविरोधात काँग्रेसचं राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

महायुती सरकारविरोधात काँग्रेसनं आज राज्यभरात चिखल फेको आंदोलन केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपा आघाडीचं सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून मजा मारत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, महागाई, बेरोजगारीनं लोकांना जगणं कठिण झालं आहे. बियाणं आणि खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचं भविष्य सरकारनं उद्धवस्त केलं आहे. म्हणून हे आंदेलन केल्याचं पटोले यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगि...