September 11, 2024 2:05 PM

views 38

यागी चक्रीवादळामुळं व्हिएतनामध्ये १४१ जणांचा मृत्यू, ५९ जण बेपत्ता

व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळ आणि त्यानंतर झालेल्या पूर आणि भुस्खलनामुळे जवळपास १४१ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण बेपत्ता आहेत. व्हिएतनामची राजधानी हानोईमधल्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आज दुपारपर्यंत यात आणखी वाढ होईल अशी शक्यता जल-हवामान विभागाने वर्तवली आहे. थाओ नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होणार असल्याचं त्यांनी कळवलं आहे. चक्रीवादळामुळे व्हिएतनामच्या ईशान्य भागात शनिवारी अनेक ठिकाणी दरड कोसळली. यात निवासी आणि औद्योगिक भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याआधी फिलिपिन्स आणि ची...

August 30, 2024 1:51 PM

views 43

अरबी समुद्रात असना चक्रीवादळाची चाहूल

अरबी समुद्रात ईशान्येकडे 'असना' हे चक्रीवादळ तयार होत आहे, सध्या निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या पश्चिम-नैऋत्य दिशेला दाखल झालं असून, येत्या १२ तासांमध्ये त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. मान्सूनमध्ये चक्रीवादळ तयार होणं ही दुर्मीळ बाब असून, याआधी १९६४ साली ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं होतं. सुरुवातीला हे चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्येकडे आणि त्यानंतर कच्छ किनाऱ्याकडे सरकेल. कच्छच्या किनाऱ्यावरून हे चक्रीवादळ ईशान्...