February 6, 2025 11:23 AM

views 36

घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतनाा ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, जिल्ह्याचा २०२५-२६ या वर्षाचा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून, प्राप्त निधीचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठी करा...