July 21, 2024 2:06 PM

views 30

देशभरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

देशभरात आज गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हा दिवस मानवी जीवनात ज्ञान आणि अभ्यासाच्या महत्वाची तसंच आदरणीय गुरूंची आठवण करून देतो. आजचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आणि आध्यात्मिक गुरूंना वंदन करून आदरभाव व्यक्त करतात. यानिमित्तानं आज शाळा, महाविद्यालयात आणि विविध समुहात विशेष कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. राज्यात शिर्डी, अमरावती आणि शेगाव इथंही गुरू पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आले ...