November 9, 2024 1:58 PM

views 52

बँकॅाकहून आलेल्या २ प्रवाशांकडून गांजा जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी काल बँकॅाकहून आलेल्या २ प्रवाशांकडून गांजा जप्त केला आहे. सुमारे १५ किलो गांजाची किमत अंदाजे १५ कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

October 3, 2024 3:03 PM

views 54

नांदेड जिल्ह्यात सुमारे १४ क्विंटल गांजा जप्त

नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या शिवणी बामणी, डोंगरगाव आणि दिग्रस शिवारात छापा टाकून पोलिसांनी ६७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा सुमारे १४ क्विंटल गांजा जप्त केला आहे. या भागात गांजाची लागवड अवैधपणे केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना ही कारवाई केली. या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कायद्यांअंतर्गत ७ जणांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

July 14, 2024 7:05 PM

views 57

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या पथकानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ४ किलो २७ ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचा आणि १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय नागरिकाकडे खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेला गांजा आढळल्यानंतर त्याला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.