September 28, 2024 7:13 PM

views 70

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतल्या पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. या पहिल्या रेल्वेगाडीतून ८०० ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आपली वडीलधारी मंडळी ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

July 28, 2024 7:31 PM

views 59

विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाचं उपलजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

कोल्हापुरात विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळानं उपलजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याविषयीचं निवेदन त्यांना सादर केलं. विशाळगडावरच्या कथित अतिक्रमणाचा प्रश्‍न समोपचारानं सुटणं शक्य असतानाही, षडयंत्र करून मुस्लिम वस्तीला लक्ष्य केलं गेलं, इथल्या मशि‍दीवर झालेला हल्ल्यानं मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून तो दहशतीच्या सावटाखाली वावरत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.   हिंसाचाराची ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना अशोभनीय आहे, य...