November 12, 2024 11:05 AM

views 12

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्य शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही महापूजा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. लातूर जिल्ह्यातले सागरबाई आणि बाबुराव सगर या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिक...