April 5, 2025 3:24 PM

views 51

आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं

रामनवमी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पांबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत. आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल.  

July 31, 2024 3:35 PM

views 50

आकाशवाणी मुंबईतर्फे सूर और सावन कार्यक्रमाचं आयोजन

पावसाच्या धारांसोबत सुरांचा आनंद घेण्यासाठी आकाशवाणी मुंबईनं सूर और सावन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. उद्या आकाशवाणी मुंबईच्या चर्चगेट इथल्या सभागृहात संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये पंडित अजय पोहनकर, आणि अंजली पोहनकर यांचं उपशास्त्रीय गायन, पूर्बायन चॅटर्जी यांचं सतारवादन आणि राकेश चौरसिया यांचं बासरीवादन सादर होईल.