June 20, 2025 1:46 PM

views 58

११व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित योगसंगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या १० लाखांच्या वर

अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या २१ जूनला साजरा होणार आहे. आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमधे भाग घेणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आव...

June 18, 2025 11:04 AM

views 59

छत्रपती संभाजीनगर – बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या शनिवारी साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिनाचा मुख्य कार्यक्रम ऐतिहासिक बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आहे. सकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण आणि सामूहिक योगासनं होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही थेट प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक योग संस्थांनी आणि व्यायाम प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.