August 31, 2024 1:15 PM

views 57

अरबी समुद्रावरल्या ‘आस्ना’ चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

चक्रीवादळ ‘आस्ना’ पुढल्या चोवीस तासात अरबी समुद्रावरुन वायव्य आणि इशान्येच्या दिशेने सरकेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला.  अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिसा, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची किनारपट्टी तसंच यानम पुदुचेरी इथं दोन दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या सहा दिवसात राज्यात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. ...

August 30, 2024 1:51 PM

views 57

अरबी समुद्रात असना चक्रीवादळाची चाहूल

अरबी समुद्रात ईशान्येकडे 'असना' हे चक्रीवादळ तयार होत आहे, सध्या निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या पश्चिम-नैऋत्य दिशेला दाखल झालं असून, येत्या १२ तासांमध्ये त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. मान्सूनमध्ये चक्रीवादळ तयार होणं ही दुर्मीळ बाब असून, याआधी १९६४ साली ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं होतं. सुरुवातीला हे चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्येकडे आणि त्यानंतर कच्छ किनाऱ्याकडे सरकेल. कच्छच्या किनाऱ्यावरून हे चक्रीवादळ ईशान्...

August 24, 2024 8:46 AM

views 89

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये – हवामान खात्याचा इशारा

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे आज मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली असताना वादळ सदृश्य वातावरण तयार झाल्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.