February 11, 2025 2:04 PM

views 62

विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षणाचा आज समारोप

महाराष्ट्र विधीमंडळात प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांसाठी नवी दिल्लीत संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे; या कार्यक्रमाचं उद्घाटन काल लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या हस्ते झालं. राज्य विधीमंडळाच्या सदस्यांनी शून्य तास, प्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन बिर्ला यांनी यावेळी केलं. या प्रशिक्षणाचा समारोप आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत होणार...

February 7, 2025 12:49 PM

views 50

मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन

विविध विषयांतील माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदावावी, असं आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलं. मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं उद्घाटन काल डॉक्टर गोऱ्हे आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. केवळ मोबाईलवर गुंतून न राहता रोज काहीतरी वाचन करा, समाजमाध्यमावर व्यक्त होताना कायद्याच्या चौकटीत राहून लिहिण्याचा प्रयत्न करा, चांगल्या लेखनाचा अनुभव घ्या असा सल्ला डॉक्टर गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना दिला. उच्च आणि त...

October 5, 2024 8:28 PM

views 53

निर्जनस्थळी गस्त वाढवण्यासह पोलिसांना दक्ष राहण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश

निर्जनस्थळी गस्त वाढवण्यासह पोलिसांना दक्ष राहण्याचे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. पुण्यात पोलिसांच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. निर्जनस्थळी रात्रीच्या वेळी प्रकाश झोत आणि भोंग्यांची व्यवस्था करावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी, अशा सूचना गोऱ्हे यांनी दिल्या.