खेळ

January 28, 2025 8:30 PM

views 67

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

उत्तराखंडमधे, देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सरकार खेळाडूंसाठी जास्तीत जास्त संधी निर्माण करत असून खेळ हे देशाच्या सर्वांगीण विकासाचं प्रमुख अंग आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. खेळासाठी...

January 28, 2025 3:47 PM

views 76

महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा १५० धावांनी विजय

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्स गटाच्या अंतिम सामन्यात भारताने स्कॉटलंडवर दीडशे धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत केवळ ५८ धावांवरच गडगडला. स्कॉटलंडची सुरुवात ही चाचपडत झाली. अवघ्या १३ धावांवर पिप्पा केली...

January 28, 2025 1:43 PM

views 82

महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्सच्या फेरीतल्या अंतिम सामन्यात भारतानं स्कॉटलंडसमोर २०९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताची सलामीवीर गोंगदी त्रिशाने नाबाद ११० धावा केल्या. अवघ्या ५९ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने तिनं ही कामगिरी केली. जी कमलीनी हिने अर्धशतक केलं....

January 27, 2025 7:19 PM

views 552

जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि स्मृती मानधनाला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०२४करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावं जाहीर केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याला सर्वोत्कृष्ट कसोटीपटू तर महिला क्रिकेटमधे डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला एकदिवसीय सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.   पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेट...

January 27, 2025 4:02 PM

views 76

स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं महिला एकदिवसीय क्रिकेट मधे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिला जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरात तिनं १३ एकदिवसीय सामन्यांमधे मिळून ७४७ धावा करुन विक्रमाची नोंद केली. यात ४ शतकी खेळी होत्या. हा देखील महिला क्रिकेटमधला विक्रम आहे. तिच्या...

January 27, 2025 12:41 PM

views 34

खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप

खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धांच्या पहिल्या टप्प्याची आज सांगता होत आहे. भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या पुरुष संघांमधे आईस हॉकीमध्ये आज अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकून, पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.

January 26, 2025 7:13 PM

views 42

रणजी करंडक : महाराष्ट्राचा बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नाशिक इथं झालेल्या सामन्यात आज महाराष्ट्रानं बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्रानं पहिल्या डावात, २९७ धावा केल्या होत्या, तर बडोद्यानं १४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात ७ बाद ४६४ धावांवर महाराष्ट्रानं आज आपला डाव घोषित केला. सौरभ नवलेनं नाबाद १२६ धावा केल्...

January 26, 2025 7:11 PM

views 38

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं आहे. त्यानं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्यावर ६-३, ७-६, ६-३ अशी सहज मात केली. २ तास, ४२ मिनिटं चाललेल्या या सामन्यावर सिनरनं सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. त्याला एकाही ब्रेक पॉइंटचा सामना क...

January 26, 2025 8:27 PM

views 21

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर ८ गडी राखून मात

आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर ८ गडी राखून विजय मिळवला.    भारतानं नाणेफेक जिंकून बांग्लादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला. बांगलादेशानं नि...

January 26, 2025 2:44 PM

views 27

ICC Cricket U-19 : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश सामना

आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत Ep आज क्वालालंपूर इथं सध्या सुरू असलेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशाच्या ११ षटकांत ५ बाद ३० धावा झाल्या होत्या.    आत्तापर्यंतचे सर्व सामन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.