खेळ

December 13, 2025 8:44 PM

views 73

ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उन्नती हुडा आणि इशाराणी बरुआची अंतिम फेरीत धडक

ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि इशाराणी बरुआ या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारल्यानं भारताचं सुवर्णपदक निश्चित झालं आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात उन्नती हिनं तसनीम मीर हिच्यावर १८-२१, २१-१६, २१-१६ असा विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात इशाराणीनं तन्वी हिरेमठ हिच्यावर १८-२१,...

December 13, 2025 1:10 PM

views 65

विख्यात फुटबॉलपटू लिओनल मेस्सी भारत भेटीवर

विख्यात फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर खासगी दौऱ्याच्या निमित्तानं भारतभेटीवर आला आहे.  कोलकाता विमानतळावर  आज पहाटे चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोलकात्यात लेक टाऊन इथं त्याच्या सन्मानार्थ ७० फुटी पुतळा उभारला आहे. आपल्या तीन दिवसांच्या भारतभेटीदरम्यान मेस्सी  हैदराबाद, मुंब...

December 12, 2025 2:36 PM

views 79

१९ वर्षांखालच्या आशियाई क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईमधे सुरु

१९ वर्षांखालच्या आशियाई क्रिकेट स्पर्धा आजपासून दुबईमधे सुरु होत आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या पहिल्या  सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत.

December 12, 2025 1:27 PM

views 74

स्क्वॉश विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चेन्नईमध्ये सुरु असलेल्या स्क्वॉश विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या गट ब सामन्यात, भारतानं ब्राझीलवर ४-० असा दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वेलावन सेंथिलकुमारनं पेड्रो मोमेट्टोवर ३-० नं मात करत विजयामध्ये योगदान दिलं. भारतानं  यापूर्वी आपल्या  पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडला ४-० असं हरवलं ...

December 12, 2025 10:46 AM

views 74

वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

चंदीगड इथं काल झालेल्या वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 51 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्यांच्या 4 बाद 213 धावा झाल्या. उत्तरादाखल भारतीय संघ सर्वबाद 162 धावाच करु शकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा सामना येत्...

December 11, 2025 3:08 PM

views 50

FIH: हॉकी पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताला कांस्यपदक

एफआयएच (F.I.H) हॉकी पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं अर्जेंटिनावर ४-२ अशी मात करून कांस्यपदक पटकावलं.   सुरवातीला अर्जेंटिनानं दोन गोल करून आघाडी मिळवली मात्र नंतर भारताच्या अंकित पाल, मनमीत सिंह, शारदानंद तिवारी आणि अनमोल एक्का यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि कांस्यपदकावर नाव क...

December 11, 2025 3:04 PM

views 126

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिक टी-२० सामना आज चंडीगड इथं होणार

क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी-२० सामना आज चंडीगड इथं होणार आहे.   संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-०नं आघाडीवर आहे.

December 11, 2025 3:02 PM

views 52

छत्तीसगडमधे बस्तर ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन

छत्तीसगडच्या बस्तर इथं आजपासून तीन दिवस बस्तर ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री विष्णुदेव साय करतील.   ऑलिम्पिक पदकविजेती मुष्टियोद्धा मेरी कोम आज या कार्यक्रमात सहभागी होईल. स्पर्धेचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार आहे. प्रसिद्ध फ...

December 11, 2025 12:11 PM

views 51

एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनी विजयी

चेन्नई इथं काल रात्री झालेल्या एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, गतविजेत्या जर्मनीनं निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूट-आऊटमध्ये स्पेनचा 3-2 असा पराभव करून आपलं आठवं विजेतेपद पटकावलं. त्यापूर्वी काल, यजमान भारतानं अर्जेंटिनावर 4-2 असा विजय मिळवून कास्यप...

December 10, 2025 9:57 AM

views 97

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 101 धावांनी विजय

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील कटक मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात, भारतानं काल दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी पराभूत केलं.   भारतानं दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 74 धावांमध्ये गारद झाला. हार्दिक पांड्या 28 चेंडूत 59 धावा करून सामनाव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.