खेळ

July 2, 2024 1:03 PM

views 62

२३ वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ८ पदकं जिंकत भारत अग्रस्थानी

जॉर्डन इथं सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत २३ वर्षांखालच्या वयोगटात भारतीय कुस्तीपटूंनी ८ पदकं जिंकून अव्वल स्थान पटकावलं आहे.  यात चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या ७० किलो वजनी गटात अभिमन्यू याने, ९२ किलो गटात जॉन्टी कुमारी, ९७ किलो गटात साहिल ज...

July 1, 2024 7:38 PM

views 64

महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दहा गडी राखून विजय

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं आज दहा गडी राखून विजय मिळवला. आज चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात आफ्रिकेनं सर्वबाद ३७३ धावा करून ३६ धावांची आघाडी घेतली होती. भारतानं हे आव्हान एकही गडी न गमावता पूर्ण केलं.  भारतानं पहिल्या डावात ६०३ धावांची सर्व...

July 1, 2024 3:54 PM

views 74

टेनिस जगतातली प्रतिष्ठेची विंबल्डन स्पर्धा आजपासून रंगणार

हिरवळीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या जगातल्या प्रतिष्ठेच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना एस्टोनियाच्या मार्क लाजेल याच्याबरोबर होणार आहे. भारतीय खेळाडू सुमित नागलचा पुरुष एकेरीचा पहिला सामना सर्बियाच्या ...

July 1, 2024 1:32 PM

views 90

T-२० विश्वचषक विजेत्या पुरुष क्रिकेट संघासाठी बी.सी.सी.आय कडून, १२५ कोटी रुपयांची बक्षीसं जाहीर

टी-२० विश्वचषक चषकाला गवसणी घातलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १२५ कोटी रुपयांच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री बार्बाडोस मधील भारताच्या विजयानंतर नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी भारतीय खेळाडूंचं अभिनंदान केलं आणि ही घोषणा केली.  

July 1, 2024 1:14 PM

views 71

महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०५ धावांची आघाडी

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे १०५ धावांची आघाडी आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर संपुष्टात आला असून, त्यांना फॉलो ऑन मिळाला. स्नेहा राणा हिनं ८ बळी घेऊन इतिहास घडवला, तर दीप्ती शर्म...

June 30, 2024 8:41 PM

views 67

क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यानं आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. समाज माध्यमावरच्या संदेशातून जडेजानं ही घोषणा केली. फेब्रुवारी २००९मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून जडेजानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं टी २०मध्ये एकूण ७४ सामन्यात ५१५ धावा केल्या असून ...

June 30, 2024 7:58 PM

views 55

राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा : महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत ज्योती याराजीला सुवर्णपदक

राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत ज्योती याराजी हिनं आज महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं. हरयाणामधे पंचकुला इथं झालेल्या या स्पर्धेत ज्योतीनं १३ मिनिटं ६ सेकंदांत अंतर पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावलं. पुरुषांच्या ११० मीटर अडथळा स्पर्धेत तेजस शिर्से याने १३ मिनिटे ५४ सेकेंदांत अंतर प...

June 30, 2024 7:19 PM

views 64

जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : महिला दुहेरीत भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान

ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत दिया पराग चितळे आणि यशस्विनी घोरपडे या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत जपानच्या साकुरा योकोई आणि सात्सुकी ओडो या जोडीनं त्यांचा ३ - ० असा पराभव केला.

June 30, 2024 7:14 PM

views 63

माजी फूटबॉलपटू भूपिंदर सिंग रावत यांचं निधन

भारतीय फूटबॉलपटू भूपिंदर सिंग रावत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. देशांतर्गत फूटबॉल सामन्यांमध्ये ते दिल्ली गॅरिसन, गोरखा ब्रिगेड, मफतलाल यासारख्या संघांमधून खेळले होते.  १९६९मध्ये मलेशियातल्या मेरडेका सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या  भारतीय फूटबॉल संघातही ते होते. अनेक स...

June 30, 2024 1:33 PM

views 81

T20 क्रिकेट विश्वचषक १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तब्बल १७ वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषाला उधाण आलं होतं, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैद्राबाद, दिल्ली या शहरांसह जागोजागी रस्त्यांवर तिरंगा फडकावत क्रिकेट प्रेमींनी विजयोत्सव साजर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.