खेळ

August 12, 2024 1:51 PM

views 49

हरियाणात सप्टेंबरमध्ये महिलांसाठी पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा

महिलांसाठीची पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा येत्या सप्टेंबरमधे हरियाणात होणार असून, त्यात 15 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर कबड्डी खेळाला महत्त्व प्राप्त व्हावं, या खेळाचा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये समावेश व्हावा आणि 2036 मध्ये भारतामध्ये ऑलिंपिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दृष्टीने भारताच्या ...

August 10, 2024 4:05 PM

views 49

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतची कांस्यपदकाला गवसणी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत यानं काल पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यानं प्युर्टो रिकोच्या डेरियन क्रूजला १३-५ असं हरवलं. पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे भारताचं सहावं आणि कुस्तीतलं पहिलं पदक आहे. २१ वर्षं आणि २४ दिवस वय असलेला अमन ऑलिम्पिक ...

August 9, 2024 7:30 PM

views 48

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती, ॲथलेटिक्स आणि गोल्फ स्पर्धेत भारताचे खेळाडू मैदानात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजच्या दिवशी कुस्ती, ॲथलेटिक्स आणि गोल्फ स्पर्धेत भारताचे खेळाडू मैदानात आहेत. कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात कास्यपदक पटकावण्याच्या उद्देशाने अमन सेहरावत आज रात्री लढत देईल. गोल्फमध्ये अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांचा तिसऱ्या फेरीचा सामना सध्या सुरू आहे. दरम्यान, ...

August 9, 2024 6:05 PM

views 94

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यांना रौप्यपदक

पॅरिस ऑलिम्पिकच्या कालच्या दिवशी भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं रौप्यपदकावर नाव कोरलं, तर पुरुष हॉकी संघानं कांस्यपदकाला गवसणी घातली. या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे. संपूर्ण देशाला न...

August 8, 2024 12:44 PM

views 103

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने केली निवृत्तीची घोषणा

पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट हिनं आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली. समाजमाध्यमावर पोस्ट करत आपण सर्व चाहत्यांच्या आणि देशवासियांच्या कायम ऋणात राहू असं विनेशनं म्हटलं आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात तिने क्रीडा लवादाकडे अपिल केलं असून आपल्याला संयुक्तपणे रौप्य ...

August 8, 2024 12:42 PM

views 48

पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज नीरज चोप्रा पुन्हा मैदानात उतरणार

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पुन्हा आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.   तर पुरुष हॉकी संघाची कास्य पदकासाठी स्पेन बरोबर लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार नीरज चोप्राचा सामना रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी ...

August 8, 2024 10:52 AM

views 59

भारत – श्रीलंका अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव

श्रीलंकेकडून काल ओडीआय मालिकेमद्धे तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामाना करावा लागला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारतासमोर 249 धावांच आव्हान ठेवलं होतं परंतु 138 धावांमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. पहिला सामना बरोबरीत संपल्यानंतर दूसरा सामना श्रीलंकेनं 32 धावांनी जिंकला. 27 वर्षांनंतर श्रीलं...

August 7, 2024 8:30 PM

views 51

तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान

श्रीलंकेत कोलंबो इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून २४८ धावा केल्या. अविष्का फर्नांडोचं शतक थोडक्यात हुकलं त्यानं ९६ धावा केल्या. कुशल मेंडिस ...

August 7, 2024 1:21 PM

views 60

वजन अधिक भरल्यानं भारताची पैलवान विनेश फोगाट पॅरीस ऑलिम्पिकमधून अपात्र

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची पैलवान विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. अंतिम फेरीच्या आधी तिचं वजन काही ग्रॅमनं अधिक भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं विनेशला अंतिम फेरीचा सामना खेळता येणार नाही आणि तिला पदकही दिलं जाणार नाही. काल...

August 6, 2024 5:59 PM

views 56

नोव्हाक ज्योकोविचः ‘गोट’ ते ‘करिअर गोल्डन स्लॅम’

विख्यात टेनिसपटू, २४ वेळा ग्रँडस्लॅम पदकविजेता नोव्हाक ज्योकोविच यानं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिस एकेरीचं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच करिअर गोल्डन स्लॅम, अर्थात आपल्या कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि शिवाय ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावणाऱ्या काही मोजक्या टेनिसपटूंच्या यादीत नोव्हाक ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.