खेळ

October 14, 2024 2:26 PM

views 46

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज संध्याकाळी साडे ७ वाजता सामना होणार आहे.   पाकिस्तान हा सामना जिंकला तर भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करायची संधी मिळेल. अ गटात ऑस्ट्रेलियानं काल भारतीय संघाला पराभूत केलं. त्यामुळं उपांत्य फेरीतली त्यांची जागा निश्चित झाली आ...

October 14, 2024 11:27 AM

views 20

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय गटाला कास्य पदक

कझाकस्तानमधील अस्ताना इथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात, उपांत्य फेरीत दाखल झालेल्या भारताच्या अह्यीका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीने कास्य पदक जिंकत, इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताने पहिल्यांदाच पदक पटकावलं आहे. उपांत्य फेरीत, या जोडीला जपानच्या ...

October 14, 2024 9:27 AM

views 49

महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघावर मात

महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, शारजाह इथं काल रात्री झालेल्या अ गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ धावांनी पराभव केला. 152 धावांचा पाठलाग करताना भारतानं वीस षटकांत नऊ बाद 142 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 54 तर दीप्ती शर्मानं 29 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया...

October 13, 2024 7:07 PM

views 80

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून सुरू

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतर विभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर सुरु होणार असून ती २१ तारखेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत चार गटांमध्ये एकूण१२ संघ सहभागी होणार आहेत. साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ आपल्या गटातल्या सर्व संघांबरोबर खेळेल.

October 13, 2024 3:02 PM

views 54

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून...

October 13, 2024 1:25 PM

views 81

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह इथं आज संध्याकाळी साडेसातला हा सामना सुरू होईल. अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.

October 13, 2024 1:09 PM

views 34

आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीने पटकावलं कास्यपदक

कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात भारताच्या ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीनं इतिहास रचत कास्यपदक पटकावलं आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये पदक मिळवणारी ऐहिका आणि सुतीर्था ही पहिलीच भारतीय जोडी आहे. उपांत्य फ...

October 13, 2024 9:33 AM

views 48

टी-ट्वेंटी मालिकेत भारताचा बांग्लादेशवर संपूर्ण विजय

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये, भारतानं काल हैदराबाद इथं तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 133 धावांनी पराभव केला आणि संपूर्ण मालिका जिंकली. 298 धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा संघ 20 षटकांत सात गडी 164 धावा करु शकला. संजू सॅमसननं 47 चेंडूत 111 तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं 35 चेंडूत 75 धावा केल्या...

October 12, 2024 8:45 PM

views 71

महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडचा श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय

महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडने श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय मिळवला. जॉर्जिया प्लिमरचं अर्धशतक आणि ऍमेलिया केर हिच्या नाबाद ३४ धावांच्या बळावर न्यूझिलंडने अठराव्या शतकात श्रीलंकेचं ११६ धावांचं आव्हान पार केलं.    त्याआधी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ५ गड्यांच्या मोबदल्यात...

October 12, 2024 3:54 PM

views 41

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांची उपान्त्य फेरीत धडक

कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धांमध्ये भारताच्या अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी आज महिला दुहेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. यामुळं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्यांनी दक्षिण कोरियाच्या किम न्योंग आणि ली युन्हये या जोडीचा ३-१ असा पराभव केला....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.